कोव्हीड-१९ या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रेखा कला परीक्षा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा, २०२० चे आयोजन न करण्याबाबत.

367

 

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील कला संस्थांकडून चालविण्यात येणा-या कला शिक्षण प्रशिक्षण पदविका (ए.टी.सी.) आणि मुलभूत अभ्यासक्रम (फाउंडेशन) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी, प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक वर्षात “इंटरमिजिएट ड्रॉईंग परीक्षा” उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याबाबत संदर्भ क्रमांक (4) येथील शासन निर्णय दिनांक ३ ऑगस्ट,२००७ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तथापि, राज्यातील कोव्हीड-१९ या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय रेखाकला (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा, २०२० चे आयोजन करण्यात येऊ नये, असा प्रस्ताव कला संचालनालयाच्या संदर्भ क्रमाक (४) येथील पत्रान्व्ये सादर करण्यात आला आहे. त्यामुळे, कला शिक्षण प्रशिक्षण पदविका आणि मुलभूत अभ्यासक्रम यांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट शिथील करण्यात यावी, असे कला संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक (५) येथील पत्रान्वये प्रस्तावित करण्यात आले आहे.

राज्यातील कोव्हीड-१९ या संसर्गजन्य साथ रोगाच्या प्रादूर्भावामुळे, तसेच, विद्याथ्यांचे आरोग्य व सुरक्षीततेची बाब विचारात घेऊन शासकीय रेखाकला परीक्षा आयोजनाबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे….

शासन निर्णय:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here