वैशाली मोहनसिंह रघुवंशी यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहिर

192

 

वृत्तसेवा
अमरावती:- मातृसेवा फाउंडेशन ठाणे, स्माईल टीम यवतमाळ, साप्ताहिक/मासिक ‘शिक्षक ध्येय’ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनी राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे, त्यांचे कौतुक करून त्यांच्यातील कर्तुत्व वाढीस लावणे, त्याच्या उपक्रमाची माहिती राज्यातील सर्वाना व्हावी हा या स्पर्धे मागील मुख्य उद्देश होता.
कु . वैशाली रघुवंशी ( स. शि) आप्पास्वामी विद्यालय शेंदूरजना (अढाव) यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी राबविलेल्या “विद्यार्थी हा भाविष्यातील वैज्ञानिक” या नाविन्यपुर्ण उपक्रमाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना सुद्धा विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन मोबाईलवर झुम अप, गुगल मिटवर विद्यार्थ्याना विज्ञान विषयाचे अभ्यासक्रमातील तर इतर छोटे छोटे प्रयोग व मॉडेल तयार करणे शिकविले व त्यांच्या मध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण केली.
भविष्यात हेच विद्यार्थी मोठे संशोधन करून आपल्या देशाला महाशक्ती बनवतील,
असे विद्यार्थी हिताचे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहे.
तसेच त्यांनी कोरोना काळात गरिबांना व गरजूंना जेवण व मास्कचे मोफत वाटप केले असून आजही त्या करीत आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here