सिद्धेश्वर गवळी डहाणू:-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू याठिकाणी गुणवत्ता वाढ चळवळीने वेग घेतला असून गुणवत्तावाढीसाठी ची अजून एक कार्यशाळा सुपर सेवेंटी शिक्षकांसाठी दिनांक 13 मार्च रोजी घेण्यात आली.सदर कार्यशाळेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे लाडके माजी प्रधान सचिव माननीय श्री नंदकुमार साहेब यांनी देखील या कार्यशाळेसाठी मार्गदर्शन केले.आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार रुजवण्याचा दृष्टीने शिक्षकांनी आपल्या कर्तव्य प्रती निष्ठा बाळगणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी केले.क्वलिटी एज्युकेशन वर भर देऊन विद्यार्थ्यांच्या कौशल्यवृद्धी साठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.सदर गुणवत्ता वाढीसाठी आग्रही असणाऱ्या डहाणू प्रकल्पाच्या धडाडीच्या कार्यक्षम प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी माननीय श्रीमती अशिमा मित्तल मॅडम यांनी ही चळवळ निश्चित शिक्षकांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे सुरू असल्याचे सांगितले. श्रीयुत निलेश घुगे सर यांचे ( रोजगार हमी योजना, राज्य समन्वयक, जिल्हा वाशिम) या गुणवत्ता वाढ चळवळीच्या अनुषंगाने डहाणू प्रकल्पातील शिक्षकांना सातत्याने झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन सुरू आहे.प्रकल्पातील गुणवत्ता वाढ चळवळीसाठी कार्यरत विविध टीम आपले नियोजन श्री घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असून आपले उपक्रमांचे सादरीकरण झूम मीटिंग द्वारे करत आहेत.
काल दिनांक 13 मार्च रोजी प्रकल्पातील गुणवत्ता वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून अजून एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आश्रम शाळेतील ही शंभर टक्के विद्यार्थी शिकले पाहिजे याचा आग्रह धरत बदलत्या काळात हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणे गरजेचे आहे यावर भर दिला.विद्यार्थी स्वतः शिकू शकतात यावर विश्वास ठेवणे आणि विद्यार्थी स्वतः शिकण्यासाठी त्यांना प्रेरित करणे, पारंपारिक अध्यापन पद्धतीला छेद देऊन विद्यार्थ्यांना वर्गात जलद गतीने शिकण्यासाठी आव्हान देणे, गटात काम करण्यासाठी मार्गदर्शन करणे,पीयर लर्निंग आणि ग्रुप लर्निंग च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकसित करण्याची गरज त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केली.यातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून एकविसाव्या शतकाच्या आव्हानांना पेलणारे सक्षम विद्यार्थी निर्माण होतील. या अगोदर झालेल्या कार्यशाळांमधून या सर्व बाबींवर भर देण्यात आला होता. त्या अनुषंगाने डहाणू प्रकल्पातील शिक्षकांनी स्व स्तरावर काम करण्यास सुरूवात केली असून सेल्फी विथ सक्सेस या उपक्रमाच्या माध्यमातून गणितीय क्रिया भाषिक कौशल्ये, पाठावर आधारित अधिकाधिक प्रश्न तयार करण्यासारखी आव्हाने गेल्या दोन आठवड्यापासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली होती.सेल्फी विथ सक्सेस या उपक्रमासाठी प्रकल्पातील शाळांमधून विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.आव्हाने दिल्यास विद्यार्थी अधिक वेगाने शिकू शकतात आणि स्पर्धात्मक वातावरणात शिकण्याची गोडी त्यांच्यात निर्माण होते आणि विद्यार्थी स्वतः शिकण्यास प्रेरित होतात हे सेल्फी विथ सक्सेस च्या माध्यमातून सिद्ध झाले. काल झालेल्या कार्यशाळेच्या अनुषंगाने विषय मित्र पियर लर्निंग आणि ग्रुप लर्निंग च्या माध्यमातून अजून अधिक परिणाम कशा प्रकारे साधले जाऊ शकतील यावर श्री. घुगे यांनी मार्गदर्शन केले. जेणेकरून एकंदरीत शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल घडून येऊन शिक्षकांवर असलेल्या अतिरिक्त कामाचा बोजा कमी होऊन सक्षम विद्यार्थी निर्माण होतील.त्यामुळे काम अर्ध्यावर परिणाम दुप्पट आणि आनंद तिप्पट निश्चितच होईल अशी ग्वाही आपल्या बोलण्यातून त्यांनी दिली.

याप्रसंगी महिला दिनाच्या दिवशी ज्ञान संवाद टीम आणि तंत्र स्नेही शिक्षक समूह डहाणू यांच्यातर्फे राज्यस्तरीय हिरकणी सेवा सन्मान 2021 साठी डहाणू प्रकल्पातील अनुदानित आश्रम शाळा येथील मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चौधरी आणि शासकीय आश्रम शाळा कळमदेवी येथील प्राध्यापिका श्रीमती श्वेता पाटील यांना सन्मानित करण्यात आले होते. सदर राज्यस्तरीय हिरकणी सेवा सन्मान पुरस्कार प्रमाणपत्राचे वितरण आदरणीय माजी प्रधान सचिव श्री नंदकुमार साहेब आणि प्रकल्प अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यशाळे प्रसंगी प्रकल्पातील सुपर 70 शिक्षक, मुख्याध्यापक , सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री उमेश काशीद साहेब,श्री.पोपट चव्हाण साहेब,विस्तार अधिकारी श्री. श्री मोहिते सर , श्री .नामदेव पाटील सर, श्रीयुत बरुरे सर श्री सिद्धेश्वर गवळी सरआणि आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन शैक्षणिक आपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी बाजूची लाल रंगाची बेल प्रेस करा.Allow वर क्लिक करा आणि मिळवा ब्रेकिंग नोटिफिकेशन.