एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू यांचा शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी चा नाविन्यपूर्ण उपक्रम

520

 

दि.2 February रोजी डहाणू प्रकल्पातील शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आदिवासी विकास प्रकल्प डहाणूच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती अशिमा मित्तल मॅडम यांच्या सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाखाली सदर कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेसाठी वाशिम जिल्ह्यातील प्रेरणादायी मास्टर ट्रेनर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार आणि भविष्यवेधी शिक्षण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असणारे श्री निलेश घुगे सर डाएट वाशिम जिल्हा यांनी या कार्यशाळेत शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राचे प्रधान सचिव मा. श्री नंदकुमार साहेब यांच्या प्रेरणेने आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार आणि भविष्य वेधी शिक्षण या चळवळीला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सुरुवात झाली . वेध गटाच्या माध्यमातूनही हे कार्य सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहे.आश्रमशाळांमधील गुणवत्ता वाढीच्या समस्या शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडूनच जाणून घेत ग्रुप अॅक्टिविटी च्या माध्यमातून शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी स्व स्तरावर काय काय प्रयत्न करणे अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांच्या क्षमता कौशल्ये कशी विकसित करता येतील यावर चर्चात्मक पद्धतीने हे सेशन घेण्यात आले. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका या ठिकाणची वाबळेवाडी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेवर आधारित भविष्यवेधी शिक्षण पद्धती आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार आश्रम शाळांमध्ये सुद्धा कशा प्रकारे अमलात आणता येईल यावर सकारात्मक चर्चा घडवून आणली.केवळ भौतिक सुविधा महत्त्वाच्या नाहीत तर शिक्षणाचा दर्जा उंचावणे महत्त्वाचे आहे यावर विशेष भर दिला. गेल्या काही वर्षात आश्रमशाळांमध्ये देखील सुसज्ज इमारती, भव्य प्रयोगशाळा, आधुनिक संगणक कक्ष उभारले गेले आहेत. यासोबत गुणवत्तावाढीसाठी देखील प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाबळेवाडी पॅटर्न प्रमाणे एकविसाव्या शतकातील कौशल्य आपल्या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ही आत्मसात होणे गरजेचे आहे यावर प्रकाश टाकत श्री घुगे यांनी 6 Cs कसे महत्त्वाचे आहेत याबाबत सांगितले. यामध्ये communication ,
collaboration ,critical thinking,confidence creativity,compassion ही
कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे.
कृतीयुक्त अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास जागृत करून आपलेही विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकले पाहिजेत यावर विचारांचे आदान-प्रदान झाले.


सदर कार्यशाळेसाठी डहाणू प्रकल्पातील शासकीय आणि अनुदानित आश्रम शाळा मधील प्रत्येकी एक शिक्षक आणि काही निवडक मुख्याध्यापक मंडळी यामध्ये सहभागी झाली होती. या संपूर्ण टीमचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून ऑनलाइन पद्धतीने आता यावर विचारांचे आदान-प्रदान, शाळेमध्ये राबवता येण्यासारखे नाविन्यपूर्ण आणि सृजनशिल उपक्रम, विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीसाठी चे प्रयत्न,
या सर्व बाबींवर चर्चा घडवून आणली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच विविध उपक्रमांसाठी आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र टीम तयार करण्याचे नियोजन असून शिक्षक स्वतः या बदलात सक्रिय सहभागी होणार आहे. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे सहभागी शिक्षक मंडळी यांनी स्वयंप्रेरणेने या कार्यात सहभागी होणे गरजेचे आहे अशी आशा व्यक्त केली. सदर कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात गट चर्चेच्या माध्यमातून संपूर्ण उपक्रमाचे नियोजन, येणाऱ्या काळात कौशल्ये वाढीसाठी करता येणाऱ्या उपक्रमशील बाबी त्याची मांडणी शिक्षकांनी केली. यानंतर श्री.घुगे सर यांनी शासकीय आश्रम शाळा वरवाडा येथे भेट देऊन विद्यार्थिनी सोबत संवाद साधला.
करोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या कालावधीत आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे आयोजित तंत्रस्नेही प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षकांनी भविष्यवेधी शिक्षण विचार शिक्षकांनी समजून घेतला आहे.आणि आता इथून पुढे खऱ्याअर्थाने त्याची अंमलबजावणी उपक्रमाच्या माध्यमातून आश्रमशाळांमध्ये राबवण्यासाठी प्रकल्प कार्यरत आहे. जानेवारी महिन्यात प्रशिक्षकांसाठी आयोजित भविष्यवेधी शिक्षणावर आधारित सहा दिवसीय TOT प्रशिक्षण झाले असून या प्रशिक्षणात शासकीय आश्रम शाळा कळमदेवी येथील उपक्रमशील तंत्र स्नेही प्राध्यापिका श्रीमती श्वेता पाटील यांचाही त्यात सक्रिय सहभाग होता.


आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार आणि भविष्यवेधी शिक्षण आश्रम शाळेतील प्रत्येक शिक्षका पर्यंत पोहोचण्यासाठी इथून पुढे ऑनलाइन प्रशिक्षणे होणार असून ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधला जाणार आहे.
सदर कार्यशाळेसाठी डहाणू प्रकल्प कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.काशीद साहेब आणि श्रीयुत मोहिते सर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री चव्हाण सर,शिक्षण विस्तार अधिकारी बरुरे सर आणि श्री सिद्धेश्वर गवळी सर यांनी या कार्यशाळेसाठी आणि उपक्रमाच्या नियोजन प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न घेतले.

https://dnyansanvad.com/archives/1151

 

नवनवीन शैक्षणिक आपडेट्स साठी आमच्या fb पेज ला लाईक कराhttps://www.facebook.com/DnyanSanvad-105728171462266/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here