राज्यामधील काही जिल्हयामध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या / मंडळाच्या शाळांतील शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळांना आवश्यकतेप्रमाणे सुट्टी घोषित करण्याबाबत यथोचित निर्णय घेण्यात यावा.असे शिक्षण आयुक्त यांनी पत्राद्वारे कळविले आहे,