Site icon ज्ञानसंवाद

Fit India पोर्टल वर राज्यातील सर्व शाळांनी नोंदणी करावी:-संचालक,SCERT PUNE

Fit India Movement अंतर्गत “खेलो इंडिया” या उपक्रमासाठी राज्यातील ८६ हजार शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. Fit India अंतर्गत शाळांची ३ स्टार व ५ स्टार अशी वर्गवारी करण्यासाठी Fit India च्या पोर्टलवर शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. यामध्ये नोंदणी केल्यानंतर शाळांना प्रमाणपत्र प्राप्त होते. आजपर्यंत महाराष्ट्रातील केवळ ८८०० शाळांनी ३ स्टार व ५ स्टार साठी आपली नोंदणी करुन प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहेत.

राज्यातील सर्व शाळांचे फिट इंडिया ३ स्टार व ५ स्टार मध्ये वर्गीकरण करण्याकरिता या पोर्टलवर जाऊन पुढील प्रमाणे नोंदणीची प्रक्रिया शाळांनी पूर्ण करावी.

१. आपल्या संगणक / लॅपटॉप / मोबाईल मध्ये गुगल क्रोम / मायक्रोसॉफ्टएज / इंटरनेट ब्राउजर उघडून त्यामध्ये https://fitindia.gov.in ही वेबसाईट Open करावी.

२. सदर वेबसाईट Open केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात Login व Register असे Tab दिसतात. यापूर्वी आपण शाळेचे ३ स्टार/५ स्टार साठी Registration केले असल्यास login वर क्लिक करावे. नव्याने Registration करत असाल तर Register लिहिलेल्या tab वर क्लिक करावे.

३. Register असे Page open होईल. Register As other वर click करावे. त्यानंतर School ही बाब select करून पुढील माहिती भरावी. शाळेचे नाव, यु डायस क्रमांक, शाळेचा कार्यरत असलेला ई-मेल, भ्रमणध्वनी क्रमांक, राज्य, जिल्हा, तालुका ही माहिती नोंदवून Password create करावा. सदरील माहिती submit करावी. Create केलेला password जतन करून ठेवावा. पुन्हा login करताना password आवश्यक आहे.

४. माहिती submit केल्यानंतर नवीन Register window open होईल. यामध्ये Welcome व आपल्या शाळेचे नाव येईल. या Dash board वरील Fit India School certification या टॅबवर क्लिक करावे.

५. Fit India School certification मध्ये Fit India School Flag खाली असलेल्या प्रश्नावली तील माहिती भरावी. या ठिकाणी शारीरिक शिक्षण विषय शिक्षक संख्या, शाळेला असलेल्या क्रीडांगणाची संख्या, क्रीडांगणाचा आकार, क्रीडांगणाचे क्षेत्रफळ, लांबी, शाळेपासून क्रीडांगणाचे अंतर क्रीडांगणाचा फोटो, शारीरिक शिक्षण विषय तासिका संख्या, शारीरिक शिक्षण विषयाच्या दैनदिन activity इ. माहितीची नोंद करावी. त्या नंतर शाळेचे प्रमाणपत्र तयार होईल. सदर प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट काढावी.

Fit India पोर्टलवर शाळा नोंदणी केली असेल असेल तर शाळा प्रमाणपत्राकरिता मुद्दा क्रमांक ४ पासून पुढे कार्यवाही करावी.

७. शाळेद्वारा School Flag करिता नोंदणी होऊन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर शाळा ३ स्टार नोंदणी करिता प्रवेशित करता येईल.

८. ३ स्टार नोंदणी झाल्यानंतर पुढील सुविधा / पात्रता असेल तर शाळा ५ स्टार नोंदणी करिता प्रवेशित करता येईल.

शाळा नोंदणी बाबतची माहिती आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व मुख्याध्यापकांपर्यंत पोहचवून, आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळा नोंदणी करून घेणेबाबत आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करावी.


संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे

Exit mobile version