यंदा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांबरोबरच नववी ,अकरावीचे विद्यार्थीही होणार सरसकट उत्तीर्ण
-शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
प्रभाकर कोळसे,हिंगणघाट(वर्धा):-मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर राज्य लाकडाउन करण्यात आले परिणामी दहावीचा भुगोलाचा पेपर ही रद्द करण्यात आला होता व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.तद्वतच पहीली ते नववी आणि अकरावी च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती देण्यात आली तर पदवी पदव्युत्तर च्या आँनलाईन,आफलाईन च्या गोंधळात आँनलाईन परीक्षा घेण्यात आली त्यात तारांबळ उडाल्याच्या घटनाही समोर आल्या.गतवर्षी शेक्षणिक सत्राचे शेवटी शेवटी कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शैक्षणिक सत्र ,परीक्षाही कोलमडल्यात.
कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर चालू शेक्षणिक सत्रही वेळेवर सुरू होऊ शकले नाही काही इयतांच्या शाळांना प्रारंभ झाला होता खरा मात्र पुन्हा कोरोनारुपी राक्षसाने राज्यात पुरता धुमाकूळ घातला आणि सत्र संपण्यापूर्वीच शाळा बंद झाल्यात.
◾SSC व HSC प्रमाणपत्र परीक्षा 2021 केंद्रसंचालक,उपकेंद्रसंचालकसाठी मार्गदर्शक सूचना◾
यंदा राज्यात शाळा महाविद्यालये कोरोनासंसर्गाचे पार्श्र्वभूमीवर बंद असली तरी विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षण देणे सुरू होते.शालेय शिक्षण विभागाने यंदा दहावी, बारावी च्या ऑफलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असुन वेळापत्रकानुसार या महिन्यात परीक्षा होणार आहेत.मात्र कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दोन एक दिवसांपूर्वी घेतलं होता त्यापाठोपाठ नववी आणि अकरावी च्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे.