सर फाऊंडेशन’, सोलापूर ने केली अनोख्या पद्धतीने धुळवड साजरी

250

 

अनघा जहागीरदार,:- ‘सर फाऊंडेशन’,सोलापूर आयोजित “विविध गुणदर्शनांची धुलवड” या कार्यक्रमात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शिक्षक शिक्षिकांच्या विविध गायन, वादन,मिमिक्री,नृत्य,स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वादन,गायन, नृत्य व नकला या कलांचे सादरीकरण होते. राज्यभरातून जवळपास 350 च्या आसपास विविध सादरीकरणाचे व्हिडीओ प्राप्त झाले. त्यातील प्रत्येक स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे –

🎸 वादन🎹

💫 प्रथम क्रमांक
ज्ञानेश्वर नारायण दुधाणे करकंब सोलापूर
💫 द्वितीय क्रमांक
संकेत श्रीधर सावंत कुडाळ सिंधुदुर्ग
💫 तृतीय क्रमांक
कुमुदिनी दत्तात्रय गिड्डे माढा सोलापूर
💫 उत्तेजनार्थ
प्रतिमा चंद्रास पोकाळे कणकवली सिंधुदुर्ग
💫 उत्तेजनार्थ
प्रिया सचिन कोळे शिरोळ कोल्हापूर.

🎤गायन🎶

💫 प्रथम
अभयकुमार अजित पोतदार
हातकणंगले, कोल्हापूर
💫 द्वितीय
कीर्ती दिनकर डोळस
निगडी पुणे
💫 तृतीय
राजेश रंगराव पाटील
कोडोली, पन्हाळा, कोल्हापूर
💫 उत्तेजनार्थ
सागर रामचंद्र जाधव
दहिवडी, सातारा
💫 उत्तेजनार्थ
शुभांगी आबासो शिंदे
फलटण, सातारा

😂नकला🤣

💫 प्रथम
सतिश गोरखनाथ गिरीबुवा
कवठेमहांकाळ सांगली
💫 द्वितीय
हेमंत उत्तमराव चौधरी
💫 तृतीय
वनिता विठ्ठल जाधव
सांगोला, सोलापूर
💫 उत्तेजनार्थ
स्मिता भाऊसाहेब कापसे
सोलापूर
💫 उत्तेजनार्थ
गोपाल वसंत खाडे
वाशिम

💃नृत्य

💫 प्रथम
दर्शना उपाध्ये
सोलापूर
💫 द्वितीय
संजीवनी नाईकनवरे आणि उर्मिला भिसे
सोलापूर
💫 तृतीय
सुनयना नाकोड
ठाणे
💫 उत्तेजनार्थ
सुनिता लहाणे
अमरावती
💫 उत्तेजनार्थ
राजन गरुड
पालघर.
या स्पर्धांच्या परीक्षणाचे काम मा. उन्मेष शहाणे (शिवरंजनी संगीत परिवार, सोलापूर) व मनिषा जोशी ( कथक नृत्यांगना, सोलापूर) यांनी पाहिले. स्पर्धेचे बक्षीस वितरण दि.30/03/2021 रोजी नाट्य-सिने अभिनेते मा.श्री.अमरजी तडवळकर यांचे शुभहस्ते ऑनलाईन करण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर डाएट प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे सर, प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा. संजयकुमार राठोड सर उपस्थित होते तर जेष्ठ अधिव्याख्याता, डाएट सोलापूर डॉ. इरफान इनामदार सर व शिवरंजनी संगीत परिवाराचे मा. उन्मेष शहाणे सर, सर फाऊंडेशन चे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे सर व बाळासाहेब वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमीर तडवळकर सर म्हणाले,”शिक्षक हा फक्त शिक्षक नसून विविध कलागुणांचे भांडार आहे हेच या कार्यक्रमातून दर्शकांना पाहायला मिळाले आहे. अशा सर्व गुणी सरांना माझा ‘सर’सलाम! ” कार्यक्रमाचे प्रास्ताविक सर फाऊंडेशन महिला राज्य समन्वयक हेमा शिंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जहागिरदार यांनी केले. तंत्रज्ञानाची बाजू राजकिरण चव्हाण यांनी सांभाळली तर नवनाथ शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची संकल्पना अनघा जहागिरदार यांची होती तर निर्मिती व तंत्रज्ञान यांची बाजू राजकिरण चव्हाण यांनी सांभाळली. तर नवनाथ शिंदे, मारुती शहाणे, नर्मदा मिठ्ठा, ज्योती पाटील, सुचिता मदने, वनिता जाधव तसेच टीम सर फाऊंडेशन, महाराष्ट्र चे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन टीम सर फाऊंडेशन सोलापूर ने केले होते.