नाशिक- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी नाशिक प्रकल्पातील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकां साठी आस्थापना विषयक व लेखाविषयक प्रशिक्षण विभागिय प्रशासकीय संस्था, नाशिक येथे शनिवार दिनांक- २४/१२/२०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते.
नवनवीन गोष्टी शिकत असतांना मनुष्य नेहमी तरुण असतो, आणि शिकणे थांबविले की म्हातारा होतो. त्यामुळे शिकण्याची संधी
आयुष्यात कधीही सोडू नये असे ए. आ. वि. प्र. नाशिकचे प्रकल्प अधिकारी तथा सहा जिल्हाधिकारी श्री. जितीन रहमान (भा. प्र.से) यांनी प्रशिक्षणाच्या सुरवातीस मुख्याध्यापकांना संबोधित केले.
मुख्याध्यापक हे आश्रमशाळा व प्रकल्प कार्यालय यामधील प्रशासकीय दुवा आहे.त्यामुळे मुख्याध्यापकांचा आस्थापना व लेखा विभागाशी वारंवार संबंध येतो त्यामुळे या विषयक बाबीची माहीती करून घेतल्यास मुख्याध्यापकाच्या कामकाजातील अडचणी दूर होऊन कामकाज अधिक प्रभावित होईल या साठी हे प्रशिक्षन नाशिक
प्रकल्पच्यावतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात श्री नितांत कांबळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( प्रशासन ) यांनी विषद केले.
एक दिवशी प्रशिक्षणात मुख्याध्यापकांनी लेखा व आस्थापना विषयक बाबी मार्गदर्शक व सुलभक श्री. बाबासाहेब शिंदे व श्री मोराणकर यांचे कडून समजून घ्यावी असे आवाहन लेखाधिकारी श्री. जेजुरकर साहेब यांनी केले.
यावेळी स.प्र.अ श्री. प्रशांत साळवे, सहा. लेखा अधिकारी देशपांडे साहेब, कनिष्ठ लिपिक श्री. दाभाडे यांचेसह नाशिक प्रकल्पातील 39 आश्रमशाळेतील मुख्याध्यापक तसेच प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
◼️शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची माहिती
♦️पदोन्नती नाकारल्यास उद्भवणारे परिणाम