Site icon ज्ञानसंवाद

पदोन्नती प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठी आश्रम शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी घातले साकडे.


मा. श्री.हिरालाल सोनवणे साहेब,आयुक्त,आयुक्तालय नाशिक तसेच मा.श्री सुदर्शन नगरे साहेब उपायुक्त,अपर आयुक्त कार्यालय नाशिक यांना प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या देय असलेली पदवीधर प्राथ. शिक्षक व माध्यमिक शिक्षक या पदासाठी ची पदोन्नती रखडलेली जलद गतीने व्हावी व प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळावा या मागणीसाठी चर्चा करताना व निवेदन देताना शासन मान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्री. संजय जाधव व राज्य कार्याध्यक्ष श्री.सुभाष बावा व इतर सर्व संवर्गातील सभासद कर्मचारी उपस्थित होते.

मा.श्री सुदर्शन नगरे साहेब उपायुक्त,अपर आयुक्त कार्यालय नाशिक,यांना निवेदन देतांना


कर्मचाऱ्यांनी आपल्या निवेदनातील प्रमुख मागणी अनुषंगाने ज्या मुद्द्यांवर त्यानुसार जून -2021 ची रखडलेली प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया मे 2022 सत्र अखेर, आणि बदली प्रक्रिये अगोदर पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन मा आयुक्त श्री.हिरालाल सोनवणे साहेब, व मा.उपायुक्त श्री.सुदर्शन नगरे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद आश्वासन दिले. यासाठी शासनमान्य आदिवासी विकास संघटनेचे सरचिटणीस मा. श्री.संजय जाधव, निरिक्षक, विभागीय उपाध्यक्ष मा.श्री.गोकुळ राव, यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले, सर्व एकूण सातही प्रकल्पातील प्राथमिक व पदवीधर प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेची वज्रमूठ दाखवली.

Exit mobile version