Site icon ज्ञानसंवाद

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दोन पुर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पुर्ण करता येईल! यूजीसीचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी केली घोषणा


हिंगणघाट ( वर्धा ): प्रभाकर कोळसे

विद्यार्थी आता एकाच विद्यापीठात किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांमधून दोन पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील. विद्यापीठ अनुदान आयोग लवकरच या संदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जाहीर केल्यानुसार आणि विद्यार्थ्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे जगदीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बारावीचा निकाल लागल्यानंतर लवकरच महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम करण्यास परवानगी देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग नवीन मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येत आहे. ज्यायोगे विद्यार्थ्यांना दोन पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौतिक पद्धतीने करता येतील, असेही जगदीश कुमार यांनी सांगितले.

Exit mobile version