Site icon ज्ञानसंवाद

शिक्षण मंत्री यांचा ‘संवाद’ कार्यक्रम; दहावी-बारावीच्या शिक्षक व मुख्याध्यापकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

वार्ताहर: राज्यात बारावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षित परीक्षेला 14 फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. त्या नंतर दहावीच्या लेखी परीक्षा होणार आहेत. या अनुषंगाने राज्याच्या शिक्षण मंत्री मा. वर्षा गायकवाड ह्या दहावी-बारावीच्या शिक्षक व मुख्याध्यापकांसोबत संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत.
हा संवाद गुरुवार दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 4:30 वाजता कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर सचिव मा. वंदना कृष्णा तसेच शिक्षण आयुक्त मा. विशाल सोळंकी उपस्थित राहणार आहेत. या संवादात शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना जुळण्यासाठी आपला मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. त्यानंतर मोबाईल किंवा ईमेल द्वारे युनिक लिंक शिक्षकांना पाठवली जाईल. त्यावरुन या कार्यक्रमाला शिक्षकाला मुख्याध्यापकांना उपस्थित राहता येईल व त्याद्वारेच उपस्थिती नोंदवली जाईल.
राज्यातील दहावी-बारावी वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक मा. विकास गरड यांनी केले आहे.

नाव नोंदणीसाठी लिंक-

https://jiomeetpro.jio.com/jioconf/attendee/sm-804c7127-6c03-4ecf-98d1-d24d6eed2e82/join/_eM9K-HDd6964512a1afee01644406410944

Exit mobile version