Site icon ज्ञानसंवाद

दहावी बारावीचे परीक्षा वेळापत्रक अजूनही लांबणीवर…!

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: राज्यात ओमिक्रोन चा धोका हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रुग्णांची संख्या वाढल्याची दिसल्यास दहावी बारावीच्या लेखी परीक्षा कशी होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारीचे शेवटच्या आठवड्यापासून होण्याची शक्यता असून. त्या वेळीची परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल. असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
त्यामुळे परीक्षा न झाल्यास मूल्यांकनाचा दुसरा फार्मूला सुद्धा राज्य सरकारने तयार असून मंत्रालय स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे.
दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली गेली आहे. राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थी नियमित शुल्क दिनांक 20 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. त्यानंतर आलेले अर्जासाठी विलंब शुल्क आकारण्यात येणार आहेत. विलंब अर्ज करण्याची मुदत 28 डिसेंबर पर्यंत असणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या www.mahasscboard.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करू शकतात.
दहावी आणि बारावी लेखी परीक्षांचे पूर्ण आयोजन करण्याची शिक्षण मंडळाने तयार केले आहे. सोबतच वेळापत्रक सुद्धा तयार केले आहे। फक्त शासनमान्यतेची प्रतीक्षा आहे. परीक्षा केंद्र, कोरोना प्रतिबंधित खबरदारी, अंतर्गत, बहिर्गत परीक्षण या संबंधित माहिती शाळांकडून मागविण्यात आलेली आहे. असे असताना पुढील शासन स्तरावर काय निर्णय घेईल याची प्रतीक्षा आहे.
कोरोना तिसऱ्या लाटेमुळे परीक्षा न झाल्यास मूल्यांकनाचा दुसरा फॉर्मुला मंडळाकडे उपलब्ध आहे. CBSE बोर्ड प्रमाणे राज्य मंडळाने दहावी-बारावीसाठी सेमिस्टर पद्धती अध्याप अवलंबलेली नाही. तरीसुद्धा शाळा स्तरांवर आतापर्यंत घटक चाचणी आणि प्रथम सत्र परीक्षा पूर्ण झाले आहेत. दुसऱ्या सत्राची परीक्षा देखील घेण्यात येणार आहे. या परीक्षा आणि वर्षभरातील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्याचा विचार मंडळ करणार आहेत.

शिक्षण मंडळाने शाळा स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सोबतच मूल्यांकनाच्या आणखी काही पर्यायांवर हे विचार केला आहे. सध्या या विषयांवर कोणतीही माहिती देण्याची बोर्डाने उत्सुकता दाखवलेली नाही. दहावी-बारावीची परीक्षा चे भवितव्य येणाऱ्या परिस्थितींवर अवलंबून आहे हे नक्कीच.

Exit mobile version