Site icon ज्ञानसंवाद

राज्यातील पहिली ते चौथी शाळा सुरू करण्यास मिळाली हिरवी झेंडी

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर : नुकतेच चाईल्ड टास्क फोर्सने पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरु करण्यास हिरवी झेंडी दिली आहे. नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास हरकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. सोबतच लांब राहून खेळता येणाऱ्या मैदानी खेळांना सुद्धा परवानगी देण्यात आली आहे. क्रिकेट, धावण्याची स्पर्धा अशा खेळांना सुद्धा परवानगी आहे परंतु खो-खो, कबड्डी सारख्या खेळायला परवानगी नाही.
नियमित शाळेसोबतच गतिमंद मुलांच्या शाळा ही नियम पाळून सुरू करण्यास हरकत नाही. वसतिगृह सुरू करण्यासाठी सुरुवातीला RTPCR टेस्ट करून विद्यार्थ्याला प्रवेश देता येऊ शकेल.
शाळेतील संबंधित व्यक्ती बाहेरगावी गेल्यास पुन्हा येताना RTPCR टेस्ट करण्याची सक्ती करावी. शाळा सुरू करत लसीकरण केल्यास काहीही त्रास नसल्याचं यावेळी डॉक्टरांनी मत व्यक्त केला आहे. असे निर्णय नुकतेच टास्क फोर्सनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहेत.

Exit mobile version