Site icon ज्ञानसंवाद

‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २०२१’ सहभागी होण्याची संधी

NCSC 2021 राष्ट्रीय बाल विज्ञान कॉंग्रेस
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२१’ मध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना बाल वैज्ञानिक म्हणून सहभागी होण्याची सुवर्णसंधी

सहभागाचे फायदे
१) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण होतो आणि वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान होते
२) राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर आपला प्रोजेक्ट सादर करण्याची संधी
३) राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ठ ठरलेल्या बाल वैज्ञानिकां आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध विज्ञान परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधित्व करावयाची संधी मिळते.
४) देशातील महत्वपूर्ण संशोधन संस्थांमध्ये संशोधन करण्याचा अनुभव मिळतो.
५) प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र
६) प्रत्येक मार्गदर्शक शिक्षकास प्रमाणपत्र
७) आपल्या सभोवतालच्या परीसंस्थेवरच प्रोजेक्ट सादर करायचा असल्याने कोणताही विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतो
८) रजिस्ट्रेशन झाल्यावर प्रोजेक्ट कार्यपद्धती तसेच प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे बाबत तज्ञ शिक्षकांचे विनामूल्य मार्गदर्शन

राष्ट्रीय बालविज्ञान परिषद २०२१’ सहभागी होण्यासाठीची अधिक सविस्तर माहितीसाठी येथे 👉क्लिक करा

नाव नोंदणी साठी येथे 👉क्लिक करा

नोंदणी साठी अंतिम दिनांक- 5 ऑक्टोबर 2021

शिक्षक पात्रता परीक्षा (Mahatet) सुधारित वेळापत्रक 👇

Exit mobile version