Site icon ज्ञानसंवाद

Fit INDIA Movement अंतर्गत होणार सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान चाचणी

विषय: Fit India Movement अंतर्गतच्या सामान्य ज्ञान चाचणी (Quiz) बाबत

सामान्य ज्ञान चाचणी (Quiz) चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलेले असून, साधारणपणे १ सप्टेंबर २०२१ पासून नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे. (प्रत सलग्न) चाचणीची उद्दिष्टे, स्पर्धा कार्यपद्धती, शाळा नोंदणी, विद्यार्थी नोंदणी व नोंदणी फी, शालेय स्तरावरील चाचणी फेरी, माध्यम, वेळापत्रक, वेळ, गुणदान पद्धती, प्रत्येक फेरीअंती निवड पद्धती, प्राथमिक फेरी, राज्यस्तर फेरी, राष्ट्रीय स्तर फेरी,
बक्षीस योजना, शाळेची भूमिका या सर्व बाबीची सविस्तर माहिती या परिपत्रकात नमूद केलेली आहे. या सामान्य ज्ञान चाचणी बाबतची माहिती आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उचित कार्यवाही करावी.

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,

Exit mobile version