Site icon ज्ञानसंवाद

‘संदेश’ देत आहे Whatsapp ला टक्कर; भारत सरकारने केले ॲप लॉन्च

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: Whatsapp हे जगात सर्वात लोकप्रिय असलेले मेसेजिंग ॲप आहे. याला टक्कर देण्यासाठी आता भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून आज ‘संदेस अँप’ Sandes App हे भारतीय मेसेज ॲप लाँच केले आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संदेस ॲप लॉन्च केल्याबाबत लिखित स्वरूपात माहिती संसदेत सादर केले आहे.
हे अँप पूर्णपणे भारतात विकसित केले गेले असून संदेस अँप फेसबुकच्या मालकाच्या व्हाट्सएपच्या इन्स्टंट मेसेजिंगला एक उत्तम पर्याय ठरणार आहे. असेही त्यांनी सांगितले. सध्या सरकारी कर्मचारी आणि सरकारचे निगडित इतर कंपन्यांचे कर्मचारी हे प्रायोगिक तत्त्वावर वापरत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. ‘संदेस ॲप’ हे ओपन सोर्स विचारपीठ असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे. यासोबतच याचे संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारकडे असणार आहे. ग्रुप मेसेजिंग फाईल आणि मीडिया शेअरिंग, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल आणि e-gov अँप्लिकेशन इत्यादी सुविधा संदेश मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे ॲप ‘गुगल प्ले स्टोअर’ आणि ‘एप्पल स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. असे मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले. ‘संदेस ॲप’ हे भारतीय मोबाईल ॲप्लिकेशन ला प्रोत्साहन देण्यासाठी उपलब्ध करून देणे हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. गेल्या काही महिन्यापासून व्हाट्सअप, ट्विटर या सोशल मीडिया अँप्लिकेशन आणि केंद्र सरकारमध्ये नव्या नियमांचा अंंमलबजावणी वरून वाद सुरू आहे. त्यामुळे हे संदेश ॲप नक्कीच लोकप्रिय ठरणार आहे.

Exit mobile version