Site icon ज्ञानसंवाद

स्टार प्रोजेक्ट अंतर्गत Master Trainer होण्याची संधी;महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद

STAR प्रोजेक्ट अंतर्गत BRC / CRC तसेच मुख्याध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमात सुलभक (Master Trainer) म्हणून काम करण्यास इच्छुक सहभागीपर्यंत ऑनलाईन लिंक पोहोचविणे बाबत.

संदर्भ- GOI, Ministry of Education Department of School Education & Literacy letter Dt. 25th February, 2021.

उपरोक्त विषयान्वये व संदर्भीय पत्रानुसार महाराष्ट्रात STAR प्रोजेक्ट अंतर्गत BRC / CRC तसेच मुख्याध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम या वर्षापासून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या अंतर्गत दोन प्रकारचे १. BRC/CRC अंतर्गत केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती यांचे प्रशिक्षण तसेच

. मुख्याध्यापक प्रशिक्षण अंतर्गत प्राथमिक ते उज्ज माध्यमिक स्तरावरील मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण नियोजित आहेत. या प्रशिक्षणात तज्ञ कुशल व उत्कृष्ट संवादक अश्या सुलभकांची आवश्यकता असून त्यासाठी खालील लिंक द्वारे इच्छुक व तज्ञ सुलभकांची माहिती मागविण्यात येत आहे. आपल्या अधिनस्त सर्व जिल्हे/तालुके/केंद्र अंतर्गत शाळा मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील सदस्य यांचे पर्यंत लिंक पोहोचवावी व उत्कृष्ट सुलभक प्राप्त होण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करावी. सदर ऑनलाईन लिंक जिल्ह्यातील सर्व whatsapp ग्रुप मध्ये जास्तीत जास्त शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेपर्यंत पोहोचवावी.

लिंक- https://forms.gle/QHQTHkgyLpXyHQND8

संचालक

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद

Exit mobile version