प्रभाकर कोळसे ‘हिंगणघाट ( वर्धा)
गतवर्षी पासून कोरोनासंर्गाचे पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र पुरते कोलमडले आहे.परिणामी यंदाही दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.नविन शैक्षणिक सत्र प्रारंभ झाले असले तरी अद्यपी काही भागात आँनलाईन शिक्षण सुरू आहे.मात्र सातपुड्याच्या दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क नसल्याने आदिवासी भागातील आश्रमशाळा आणि प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
त्यामुळे आता आदिवासी विकास विभागाचे वतीने आदिवासी भागात विद्यार्थ्यांसाठी सटेलाईटद्वारे शिक्षण सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता सॅटेलाईट शिक्षण सुरु करण्यात येणार आहे. मोबाईल नेटवर्क नसल्याने अनेक हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे आदिवासी विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.