Site icon ज्ञानसंवाद

११ वी CET ऑनलाईन फॉर्म भरणे सुविधा तांत्रिक कारणासाठी तूर्त बंद;राज्य मंडळ पुणे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४.

विषय: सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाईन आवदेनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवलेबाबत.

प्रकटन:-

सन २०२१-२२ च्या इयत्ता ११ वी प्रवेशासंदर्भात सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दि. २१ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या कालावधीत करण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेमध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट झालेल्या इच्छूक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरुन आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दि.२०/०७/२०२१ रोजी सकाळी ११.३० पासून दि. २६/०७/२०२१ अखेर उपलब्ध करुन देण्यात आली होती.

तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आले आहे. सदर सुविधा पूर्ववत सुरु झालेनंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल. तसेच सदर परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

—– सचिव, राज्य मंडळ, पुणे.

Exit mobile version