Site icon ज्ञानसंवाद

जवाहर नवोदय विद्यालय निकाल जाहीर

भारत सरकारने 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरु केली. सध्या 27 राज्ये व 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जवाहर नवोदय विद्यालये आहेत. भारत सरकारच्या संपूर्ण आर्थिक सहाय्याने “नवोदय विद्यालय समिती” या स्वायत्त यंत्रणेमार्फत मुलां-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरु करण्यात आलेली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत ‘जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. शिक्षणाचे माध्यम इयत्ता आठवी पर्यंत मातृभाषा किंवा क्षेत्रिय भाषा असून त्यानंतर गणित व विज्ञान इंग्रजी भाषेतून आणि समाजशास्त्र हिंदी भाषेतून शिकविण्यात येतात. जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या बोर्ड (इयत्ता 10वी व 12वी) परीक्षांना बसतात. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजन,गणवेश, निवास आणि वह्या-पुस्तके आदींची मोफत व्यवस्था केली जाते

जवाहर नवोदय विद्यालय निकाल 2023 पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा

click here

Exit mobile version