Site icon ज्ञानसंवाद

शिष्यवृत्ती परीक्षा होणार ऑफलाइन; जुलै मध्ये परीक्षा घेण्यासाठी नियोजन सुरु

शशिकांत इंगळे,अकोला

पाचवी आणि आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल-मे या महिन्यांवर कोरोना काळामुळे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र आता ती परीक्षा कोरोना दुसरी लाट ओसरत असल्याने परीक्षा परिषदेकडून या ऑफलाइन शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. जुलैमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन परिषदेकडून केले जात आहे. त्यासाठीची गोपनीय माहिती गोळा करण्याच्या सूचना राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी आणि संबंधित कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्र आणि त्याची माहिती गोळा करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहेत. या शिष्यवृत्ती परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हा स्तरांवर लवकरच पोहचते केले जाणार आहे. ते जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा आपल्या कार्यालयात मध्यवर्ती व सुरक्षा ठिकाणी निश्चित करून तेथे उतरवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.

◼️राज्यात ७ लाख विद्यार्थी परीक्षा देणार.

राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेला राज्यातून सुमारे ७ लाख हुन अधिक परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा राज्यातील ३५० हून अधिक परीक्षा केंद्रांवर घेतली जात आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोना परिस्थिती आणि त्यांचा स्तर कसा आहे याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे.

Exit mobile version