Site icon ज्ञानसंवाद

कोविड19 संबंधित कर्तव्य बजावतांना कोविड(कोरोना)मुळे मृत्यु झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांनी (नॉमिनेशन असलेल्या व्यक्तिने) 50लाख रु सानुग्रह मदत मिळणेसाठी प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे.


सदर प्रस्ताव 2 / 3 प्रतीत सादर करावा., प्रस्तावाची मूळ प्रत, (म्हणजे ओरिजिनल मृत्यु प्रमाणपत्र,ओरिजनल वारस दाखला, ओरिजिनल प्रतिज्ञापत्र असलेला प्रस्ताव) मंत्रालयात पाठवायचा असतो..

संदर्भ.:- 1)वित्त विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण2020/प्र.क्र.4/व्यय-9, दिनांक- 29/05/2020

2)वित्त विभाग ,शासन निर्णय क्र. संकीर्ण2020/प्र. क्र.4/व्यय-9 दि- 14/10/2020

3)शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रमांक:सहाय्य-2020/प्र.क्र.81/टीएनटी-6,दिनांक 07/12/2020

4)वित्त विभाग,शासन निर्णय क्र. संकीर्ण2020/प्र. क्र.4/व्यय-9 दि-14/05/2021

आता,1जाने.2021 ते 30जून 2021अखेर मयत झालेल्या कोविड कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांसाठी 50लाख रु सानुग्रह मदत प्रस्ताव दाखल करता येईल..

प्रस्ताव दाखल करतांना वरील संदर्भित चार ही शासन निर्णयाचा उल्लेख प्रत्येक कवरिंग लेटरवर (उदा- अर्जदार चे विनंती अर्ज, BEO चे कवरिंग, शिक्षणाधिकारी यांचे कवरिंग इत्यादि) मधे यायला हवा..

कुटुंबीयांचा 50लाख रु मागणी अर्ज व त्यासोबत…👇🏻

1.मयत शिक्षकाचे मृत्यु प्रमाणपत्र(मुळ प्रत.)

2.त्यांचा कोविड रिपोर्ट पॉजिटिव असल्याचे RTPCR /एन्टीजन टेस्ट प्रमाणपत्र..

3.सदर मृत्यु कोविड मुळे झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र..(प्राथमिक आरोग्यकेंद्र अथवा तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडील.)

4.शिक्षकाची कोरोना ड्यूटी संबंधिची आर्डर..
(तसेच कोविड ड्यूटी करतांनाचा फ़ोटो असेल तर फ़ोटो प्रस्तावासोबत जोड़ावा…)

5.तहसीलदार/BDO यांचे कर्मचारी कोविड19 संबधी कर्तव्यावर कार्ययरत असल्याबाबतचे प्रमाणपत्र..
(उदा-
असे प्रमाणित करण्यात येते की , कै. ——— उपशिक्षक शाळा- …… हे शिक्षक दिनांक- …. रोजी पासून …. पर्यंत , ……..या ठिकाणी , ……… या (कामाचे स्वरूप) कोविड19 संबंधित कर्तव्यावर कार्यरत होते , कर्तव्य बजावत असताना/ बजवल्या नंतर 14 दिवसांच्या आत म्हणजे दिनांक- …… रोजी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आला व कोविड ते आजारामुळे हॉस्पिटल मधे दाखल झाले व दि- ….. रोजी त्यांचा कोरोना आजारा मुळे मृत्यु झाला..
सदर दाखला त्यांचे वारसदार ….. यांना शासनाच्या 50लाख रु सानुग्रह लाभ मिळणे बाबत देण्यात येत आहे…)

6.मयत शिक्षकाचे सेवपुस्तक नामनिर्देशन पानाची BEO द्वारा अटेस्टेड XEROX प्रत.

7.सेवा पुस्तक प्रथम पानाची XEROX(BEO अटेस्टेड), प्रथम/कायम झाल्याचे नेमणुक आदेश..

8.मयत शिक्षकाचा ना देय, ना चौकशी दाखला..

9.मयत कर्मचाऱ्याचा वारस दाखला (मुळ प्रत.)

  1. एका पेक्षा जास्त वारसदार असल्यास , अर्ज करणाऱ्या वारसदारास इतर वारसदार यांनी 50लाख रु सानुग्रह मदत बाबत द्यावयाचे “संमतीपत्र/ प्रतिज्ञापत्र” म्हणजेच NOC(No Objection Certificate)

(इतर वारसदार यांनी 100रु स्टैम्प पेपर वर Affidavit लिहून द्यावे..)

11.नॉमिनी व्यक्ति जे अर्ज करत आहेत त्यांचे आधार, ID ,रेशन कार्ड इत्यादि xerox..

12.अर्जदार यांचे बैंक अकॉउंट details, सोबत पासबुक xerox..

  1. वरील प्रस्तावास BEO चे कवरिंग…लावून ते शिक्षणाधिकारी यांचे कडे पाठवावे…

14.शिक्षणाधिकारी यांनी त्यास आपले कवरिंग लावून , वरील संदर्भीय शासन निर्णय,परिपत्रक लावून सदर प्रस्ताव शिक्षण संचालक(प्राथ.)पुणे किंवा शिक्षण उपसंचालक ,यांच्या मार्फ़त किंवा डायरेक्टली शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई येथे पाठवावा…)

प्रस्तावा सोबत जोडलेल्या कागदपत्रांची चेकलिस्ट सुरुवातीस अनुक्रमणिका करून जोड़ावी )

◼️DCPS/NPS योजनेच्या सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत.

🛡️वारसदार,कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही व आवश्यक जोडपत्रे तसेच वरसदाराने सानुग्रह अनुदान मागणीसाठी करावयाचा अर्ज pdf डाउनलोड करण्यासाठी:-

Exit mobile version