स्वच्छता दिंडीने जागवली जनजागृती

168

दिनांक २० मार्च २०२५ रोजी गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुंढेगाव ता.इगतपूरी जि.नाशिक येथे ह.भ.प. भारत महाराज गतीर यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेचे मुख्याध्यापक तनवीर जहागीरदार यांच्या संकल्पनेतून स्वच्छता दिंडीला सकाळी१० वाजता सुरवात झाली.दिंडीचे नेतृत्व ह.भ.प.भारत महाराज गतीर व लक्ष्मण महाराज गतीर यांनी केले.
दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी पोषाखात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि स्वच्छतेच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. दिंडी शाळेच्या परिसरातून फिरल्यानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेचा परिसर स्वच्छ केला.


यानंतर, गतीर महाराज यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे कीर्तन सादर केले. कीर्तनातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आणि समाजात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनीही सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी समन्वयक शिक्षक नितीन केवटे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कायम लक्षात ठेवण्याची शपथ दिली.दिंडीच्या यशस्वितेसाठी अनिता घायवटे, रुपाली अहिरे,दत्तात्रय पोटे, संघालीमित्र वाघमारे, स्वाती आव्हाड,शीतल पवार,मनाली शिरसाठ, रोहिणी साबळे, वैशाली मराठे,कलाशिक्षक संजय दुर्गावाड व शालेय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here