Site icon ज्ञानसंवाद

(शिक्षण स्वयंसवेकांची नेमणुक) ५००० ₹ प्रतिमहा मानधनावर होणार शिक्षण स्वयंसेवकांची नेमणूक ; शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नागपूर

शैक्षणिक सत्र सन २०२२-२३ मध्ये शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या प्राथमिक/ उच्च प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत रु. ५०००/- प्रतिमहा या मर्यादेत मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक स्वयंसवेकांची नेमणुक करण्याबाबत.

नागपूर जिल्हयाअंतर्गत शिक्षकांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्यामुळे स्थानिक पातळीवरुन वारंवार शिक्षक उपलब्ध करुन देण्याबाबत मागणी असुन शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. करीता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हिताचे दृष्टीने जि. प. सेस फंडातुन शिक्षकांची अत्यंत आवश्यकता असलेल्या जिल्हा परिषद, प्राथमिक/ उच्च प्राथमिक / माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळामध्ये जि.प. व्दारा ठरवून दिलेल्या अटी व शर्तीचे अधिन राहून गट शिक्षणाधिकारी यांचे सनियंत्रणाखाली संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे माध्यमातुन रु. ५०००/- प्रति महीना या मर्यादेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शिक्षण स्वयसेवकांची नेमुणक करण्याबाबत योजना प्रस्तावित करण्यात आलेली आहे.

सविस्तर माहितीसाठी pdf डाऊनलोड करा CLICK HERE

Exit mobile version