Site icon ज्ञानसंवाद

सरळसेवेची पदे भरण्याच्या अनुषंगाने उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र रहिवाशी दाखला देण्याबाबत

मा. राज्यपाल महोदय यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसूचनेनुसार अनुसूचित क्षेत्रातील १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याच्या अनुषंगाने उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र रहिवाशी दाखला देण्याबाबत.

मा. राज्यपाल महोदय यांच्या दि.२९.०८.२०१९ च्या अधिसुचने मधील सरळ सेवेची १७ सवंर्गातील पदे ही राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील आहे. त्यामुळे या पदासाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना, सदर उमेदवार हा अनुसूचित क्षेत्रातील (ग्रामिण व शहरी) असल्याचा दाखला संबंधित प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी विहित मुदतीत प्रस्तुत पदांच्या जाहिरातींच्या अटी शर्तीनुसार उपलब्ध करुन द्यावा. असे करतांना वाचा मधील अनुक्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये अनुसूचित क्षेत्रातील गावातून विभाजन होऊन नव्याने निर्माण झालेल्या गावांना अनुसूचित क्षेत्राचा लाभ देण्याबाबत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.

Exit mobile version