Site icon ज्ञानसंवाद

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी (NEET/JEE/CET) मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी निशुल्क २ वर्षाचा प्रशिक्षण वर्ग;आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय जारी

अनुसूचित जमातीचे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी शासकीय / अनुदानित, विना अनुदानित तसेच शासकीय आश्रमशाळा / अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी शाळा व वसतिगृहात शिक्षण घेत असताना त्यांना अशा अभियांत्रिकी व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांसाठी बसले तरी योग्य मार्गदर्शना अभावी यशस्वी होत नाहीत. त्यामुळे त्यांचा या परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा कल वाढावा या दृष्टीने इयत्ता ११ वी व १२ वी मध्ये शिकत असतानाचा या विद्यार्थ्यांकरिता अभियांत्रिकी, वैद्यकीय व विधी पदवी, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटीस अभ्यासक्रम तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा तयारी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आय.आय.टी.मधील अभ्यासक्रमांना जास्तीस जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावी नंतर दोन वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

सविस्तर शासन निर्णय –

Exit mobile version