Site icon ज्ञानसंवाद

इ.१० वी गुणपत्रिका कधी मिळणार?,गुणांची पडताळणी कशी करता येणार? उतरपत्रिकेची छायांकित प्रत कशी मागवाल? सविस्तर मार्गदर्शन

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतः:च्या अनिवार्य विषयापैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते सोमवार, दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०३/०६/२०२३ ते गुरुवार, दिनांक २२/०६/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI Net Banking) याद्वारे भरता येईल.

दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी साठी येथे क्लिक करा

मार्च २०२३ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

३) मार्च २०२३ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२३ व मार्च २०२४) श्रेणी / गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१०वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ०७/०६/२०२३ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

मार्च २०२३ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.१० वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत बुधवार दि. १४/०६/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता वितरित करण्यात येतील.

येथे पाहता येईल 10 विचा निकाल

विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १०वी परीक्षेचा निकाल आज शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव (नोंदणीकृत) प्रविष्ट करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना निकाल व ताज्या अपडेट्ससाठी बोर्डाची अधिकृत वेबसाइट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

१) mahresult.nic.in

२) ssc.mahresults.org.in

३) sscresult.mkcl.org

——-/——–/———–///–///-/——————–

दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे यादी साठी येथे क्लिक करा

दहावी/बारावी नंतर पुढील शिक्षणाचे पर्याय👇

Exit mobile version