यूजीसी चा निर्णय
प्रभाकर कोळसे,(हिंगणघाट)-
विविध क्षेत्रातील पदवीधारकांना शैक्षणिक पात्रता नसतानाही प्राध्यापक होउन दोन वर्षे सेवा करता येणार आहे. यात प्रामुख्याने गायक ,नर्तक,उद्योग, सामाजिक कार्यकर्ते आणि इतर क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असेल .आय आय टी आणि आय आय एम मध्ये प्रोफेसर आफ प्रॅक्टिस स्कीम आधीपासूनच आहे ,
या अंतर्गत देशातील या सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये उद्योगाशी संबंधित तज्ञ सेवा देत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाची १८ ऑगस्ट रोजी बैठक झाली या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आहे.