शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहर: राज्यातील शाळा कधी सुरू होतील याबाबत लवकरच निर्णय होणार असून शिक्षण विभागाने माननीय मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि त्यापासून विद्यार्थ्यांना असलेला धोका लक्षात घेता. राज्य सरकारने 15 फेब्रुवारी पर्यंत शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता घटत असल्याने शाळा सुरू करण्यात यावे. अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे. राज्यातील शाळा ह्या कोरोना नियमांचे पालन करून सुरू करण्यात याव्यात आणि त्या संबंधित सर्व निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील विविध संघटनांकडून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी वारंवार मागणी होत होती. त्यावर विचार करून त्या प्रकारचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाने माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविला आहे. राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्यात याव्यात असे या प्रस्तावात म्हटले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या म्हणाल्यात की, आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊन आणि भविष्यातील धोक्याचा हि विचार करून कोरोना नियमांची आखणी केली जाणार आहे. आणि त्यामध्ये वेळेप्रमाणे परिस्थिती पाहून अपडेट केले जाणार आहेत. शेवटी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणून त्यासंबंधीचे सर्व अधिकार हे स्थानिक प्रशासनाला दिले जाणार आहेत. माननीय मुख्यमंत्री या संबंधित लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा माननीय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान या विषयावर मंगळवारी राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्स ची एक महत्त्वाची बैठक झाली असून टास्क फोर्सचे सदस्यांनीही राज्यातील शाळेची घंटा वाजण्याबाबत सकारात्मकता व्यक्त केली आहे.