Site icon ज्ञानसंवाद

शिक्षकांच्या बदल्या 31 मे पर्यंत मोबाईल ॲप द्वारे

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: शासनाने गेल्यावर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली तसेच पाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अभ्यास नेमण्यात आला होता. या अभ्यास गटाने वेगवेगळ्या राज्यातील शिक्षकांचे बदलीबाबत अभ्यास केला तसेच महाराष्ट्रातील शिक्षक नेत्यांशी चर्चा करून बदली प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे संदर्भात शिफारस केली होती. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये हे काम रखडले गेले होते. परंतु आता जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यावर्षी कोणत्याही परिस्थितीत 31 मे पर्यंत पारदर्शक पद्धतीने मोबाईल ॲप द्वारे बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच मोबाईल ॲप विकसित केले जाणार आहे. बदलीचा अर्ज भरण्यापासून ते बदली प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया या ॲपद्वारे पार पाडली जाणार आहे. यासाठी बदल्या करण्यासंदर्भात अभ्यास गटाने संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन बैठक घेऊन त्यात बदली विषयी संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये 31 मे पर्यंत बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. पहिल्या संवर्गाच्या बदल्या झाल्यानंतर पुढील संवर्गाच्या बदल्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत.
या मोबाईल ॲप मुळे शिक्षकांना बदली प्रक्रिया करणे सोपे जाणार आहे हे नक्की.

Exit mobile version