Site icon ज्ञानसंवाद

बालसाहित्याकांसाठी ‘जीवन शिक्षण’ मासिकाचा खास उपक्रम

‘जीवन शिक्षण’ मासिकामध्ये माहे फेब्रुवारीच्या अंकामध्ये मराठी राजभाषा दिन’ व “राष्ट्रीय विज्ञान दिन’ या निमित्त विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. तरी आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, पालकापर्यंत या माहितीचा प्रसार करण्यात यावा. तसेच विदयार्थ्याच्या स्वरचित कवितांचे संकलन करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयक, जोवन शिक्षण (अधिव्याख्याता/जेष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ) यांच्यावर सोपविण्यात येत आहे. जिल्हा समन्वयक यांनी जिल्हयातील विदयार्थ्यांच्या स्वरचित कविता संकलित करुन निवडक कविता दि. १० जानेवारी २०२२ पर्यंत जीवन शिक्षण विभागाच्या jeevanshikshan @msa.ac.in या ई-मेलवर पाठवाव्यात.

Exit mobile version