शशिकांत इंगळे,अकोला
वार्ताहार : कोरोनाचा प्रादुर्भाव देशांमध्ये गेल्या दीड वर्षापासून आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद केले होते. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून शिक्षण देण्यात आले होते. परंतु गेल्या काही काळात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत असल्याने शाळा आणि कॉलेजेस उघडण्यात आले होते. आता कोरोनाचा नवा व्हेरीऐट ओमीनक्रोन चा संकट वाढताना दिसत आहे. राज्यांमध्ये या रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. जर ही संख्या अशीच वाढत राहिली तर सुरू करण्यात आलेल्या शाळा-कॉलेजेस पुन्हा बंद करावे लागतील. असा इशारा यापूर्वीच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला होता. आता त्यांनाच व्हायरसची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा पुन्हा बंद करण्यात येतात की, काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात मागील दोन दिवसात 26 नवे रुग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात त्याची संख्या 167 वर पोहोचली आहे. या कारणाने राज्य सरकार आता सतर्क झाले आहे. जर यापुढील पंधरा दिवसात परिस्थिती आटोक्यात न आल्यास पुन्हा शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. असा इशारा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जसे की, अहमदनगर, सांगली आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता त्या शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून सुरू होतील असे वाटत नाही.
” लोकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. आतापासून पंधरा दिवसांची परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा-कॉलेजेस बाबत निर्णय घेतला जाईल. आता सुट्टीचा हंगाम आहे. त्यामुळे पर्यटन परिसर बंद करणं ही सुद्धा चांगली कल्पना ठरणार नाही” असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळांमध्ये जाऊन लसीकरण केले जाणार आहे. तर शाळा आणि कॉलेज बंद पडल्यास विद्यार्थ्यांना थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करावे लागेल. त्यामुळे येणारे 15 दिवस हे सर्वांसाठीच महत्त्वाचे ठरणार आहेत.