Site icon ज्ञानसंवाद

राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार जागतिक स्तरावर ओळख !


कौशल्य ,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विधेयक संमत


प्रभााकर कोळसे,हिंगणघाट ( वर्धा)

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास शिक्षण व प्रशिक्षण मंडळ विधेयक नुकतेच संमत करण्यात आले. या विधेयकामुळे राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आणि परीक्षा मंडळ आदी संस्था एका छत्राखाली येणार आहेत. तर विविध प्रकारच्या कौशल्य विषयक पदवी आदी अभ्यासक्रमाचे मोठे दालन राज्यात यामुळे निर्माण होणार आहे. कौशल्य विकास शिक्षण प्रशिक्षण आणि त्यासाठी असलेल्या संस्थांचे नियमन आणि नियंत्रण यामुळे होणार आहे. तद्वतच साठीच्या कार्यपद्धतीतील सुसुत्रता या विधेयकामुळे निर्माण होणार आहे.
या विधेयकामुळे राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातुन कुशल मनुष्यबळ निर्मिती च्या कामाला अधिक गती मिळणार असून हे विधेयक राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना रोजगार आणि उद्योग क्षेत्रात आपली एक अनोळखी ओळख निर्माण करून देण्यासाठी मदत होणार आहे.

Exit mobile version