दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी विधानभवनात माहिती देतांना संगीतले आहे की एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहू नये यासासाठी परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवसांपर्यंत परिक्षेसाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे.
कुठलेही विलंब शुल्क न भरता इ. १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या लेखी परीक्षा सुरु होण्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत परीक्षासाठीचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची मुभा देण्यात आली आहे. #हिवाळीअधिवेशन२०२१ pic.twitter.com/7YPc5LO23h
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 23, 2021