Site icon ज्ञानसंवाद

तुमच्या आधार वरून किती सिम Active आहेत हे तुम्हाला माहित आहे का? नसल्यास, जाणून घ्या.

सतीश लाडस्कर,भंडारा

     आपल्याला मोबाईल साठी नवीन सिम घ्यायची असल्यास आपली ओळख म्हणून आधार कार्ड मागितल्या जाते, ही बाब सर्वश्रुत आहे. एकदा सिम घेतली की तो क्रमांक आपल्या आधार ला ऍक्टिव्ह होतो. 
  बऱ्याचदा आपल्याला एकापेक्षा जास्त सिम वापरावे लागतात. किंवा वापरत असलेले काही नंबर बंदही करावे लागतात. कधीकधी आपल्या आधार आयडी वर ऍक्टिव्ह असलेलं सिम किंवा नंबर इतर कोणीतरी वापरत असतात आणि ते आपल्याला माहित नसते. परंतु आता आपण अशी एक ट्रिक जाणून घेणार आहोत की जीच्याद्वारे आपल्या आधार क्रमांकावर किती सिम/ नंबर active आहेत हे आपल्याला अगदी सहज काही क्षणात कळू शकेल. तुम्हाला माहीत न करता एखाद्याने तुमच्या आधारशी कोणताही मोबाइल क्रमांक जोडला असेल, तर तुम्ही त्याबद्दल रिपोर्ट करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही ते सिम किंवा तो नंबर वापरत नसाल तर तो बंदही करू शकता. आहे ना मजेदार ट्रिक!
    चला तर मग ही ट्रिक कशी वापरायची ते जाणून घेऊया.

★ आपल्या आधार ला लिंक केलेल्या सिम/ नंबरविषयी माहिती तपासण्यासाठी खालील स्टेप्स 👇 Follow करा.

◆ सर्वप्रथम क्रोम ब्राउझर वरून https://tafcop.dgtelecom.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

◆ आता TAF COP चे कस्टमर पोर्टल ओपन होईल.

◆ त्यानंतर दिलेल्या रकान्यात आपला मोबाईल क्रमांक टाका.

◆ आता ‘Request OTP’ या पर्यायावर क्लिक करा.

◆ आता टेक्स्ट मेसेज द्वारे प्राप्त झालेला OTP इन्सर्ट करा व Validate या बटनावर क्लिक करा.

◆ Validate करताच आपल्या आधार वर लिंक असलेले सर्व मोबाईल क्रमांक पोर्टलवर दिसतील.

◆ दिलेल्या नंबरपैकी जे नंबर आपण वापरत नसाल किंवा ते आपले नसतील तर डाव्या कोपऱ्यात असलेल्या रकान्यात टिक करा. व नंतर This is not my. हा पर्याय निवडा.

◆ अशाप्रकारे आपण वापरात नसलेले किंवा यापुढे आवश्यक नसलेले नंबर ब्लॉक करू शकतो.

Exit mobile version