Site icon ज्ञानसंवाद

आता ‘पीएचडी’ साठी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण आवश्यक;राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीचा शुभारंभ

शशिकांत इंगळे,अकोला

‘पीएचडी’ साठी ‘नेट’ अनिवार्य; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणीचा शुभारंभ

वार्ताहर: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 ची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा सुरू असताना आता खऱ्या अर्थाने शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पंधरा कृषी विद्यापीठात शैक्षणिक सत्र 2022-23 या वर्षापासून ‘पीएचडी’ साठी ‘नेट’ परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने 3 डिसेंबर रोजी एक पत्र जाली केले आहे. त्यामध्ये त्यांनी पीएचडी प्रवेशाबाबत नवे गाईडलाईन्स दिले आहेत.
कोरोना महामारी मुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत विलंब झालेला आहे. मात्र यूजीसीने राज्यातील 15 कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, परीक्षा व मूल्यांकन मंडळ संचालकांना पत्र पाठवून नव्या शैक्षणिक धोरणाचे काटेकरपणे अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी पीएचडी पदवी प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक नव्हते. परंतु आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने हे अनिवार्य केले आहे. आता नव्या नियमावलीमुळे संशोधकांना संशोधन करण्यास कस लागणार आहे हे नक्कीच. अगोदर ‘नेट’, नंतर ‘पीएचडी’ प्रवेश. अशी नवीन गाईडलाईन असणार आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 57 विषयांवर संशोधना पीएचडी पदवी घेत येणार आहे.

हा नियम पुढील विद्यापीठांना लागू असेल.

1) मुंबई विद्यापीठ, मुंबई
2) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई
3) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद
5) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
6) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
7) कवयित्री बहिणाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव,
8) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड
9) पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर
10) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
11) कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक
12) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
13) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक
14) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक
15) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे.

Exit mobile version