Site icon ज्ञानसंवाद

१ डिसेंबर पासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता

शशिकांत इंगळे,अकोला

कोरोनाचे आले नवे संकट, 1 डिसेंबरला शाळा उघडणी लांबणीवर पडण्याची शक्यता; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

साउथ आफ्रिकेत सापडला कोरोना वायरस ओमीक्रोन व्हेरीएंट (Coronavrirus New Variant Omicron)

वार्ताहर: 1 डिसेंबर ला शाळा उघडणार असा शासनाने निर्णय दिला आणि आता लगेच ओमीक्रोन व्हेरीएंट (Coronavrirus New Variant Omicron) साउथ आफ्रिकेत आढळला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने बैठक बोलावली आहे. त्या बैठकीमध्ये शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमीक्रोन व्हेरीएंट साउथ आफ्रिकेत आढळला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात अजून या वेळी रुग्ण कोठेही आढळला नाही. महाराष्ट्रात त्यांचे तत्काळ परिणाम दिसण्याची शक्यता सुद्धा नाही. परंतु अशातच शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने त्यासाठी ना हरकत नोंदवली आहे. मात्र उद्या रविवार संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाणार असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
शाळा उघडणे या विषयावर पुन्हा नव्यानं चर्चा होत असल्याने शाळा लांबणीवर जाईल याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version