Site icon ज्ञानसंवाद

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी ‘बालरक्षक’ॲप

शिक्षक मान्यता प्रक्रिया आणि शालाबाह्य विद्यार्थी शोधासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: राज्यातील शिक्षक मान्यता प्रक्रिया आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षण विभागाकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संकेत स्थळ तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मोबाईल ॲप्लिकेशन बनवण्यात येणार आहे.
राज्यातील शिक्षक मान्यता यांची प्रक्रिया याआधी ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत होती परंतु गेल्या काही वर्षात या प्रक्रियेत गैरप्रकार आणि अनियमितता आढळून आली आहे. यामध्ये काही अधिकारी वर्गावर फौजदारी कारवाई सुद्धा केलेली आहे. दोन वर्षापासून भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवण्यासाठी पवित्र संकेतस्थळाची निर्मिती करून त्याद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षक मान्यता देतील गैरप्रकार रोखण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येत आहे.
सोबतच शाळाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यां ची शोध प्रक्रिया ही मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे जोडण्यात येणार आहे. तीन ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचा शोध टाटा ट्रस्ट च्याॲप्लिकेशन द्वारे घेतला जाणार आहे.त्यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबातील चार प्रकारची माहिती संकलित करण्यात येणार आहे ही माहिती सरल प्रणाली सोबत जोडण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची माहिती आणि बाल सरंक्षण तपासता येईल या प्रक्रियेमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश करणे सोपे होईल या प्रणालीकरीता 5 तालुक्यामध्ये प्रात्यक्षिक तत्वावर सर्वेक्षण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

संकेतस्थळाचे निर्मितीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने यानंतर मात्र मान्यतेची प्रक्रिया राबवताना ती रिअल टाइम असेल त्यामुळे मागील तारखे तील मान्यता देणे अशा प्रकाराला आळा बसणार आहे सोबत शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी बालरक्षक ॲप तयार केले आहे या ॲपचा प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे आता शाळा सुरू झाल्यानंतर ॲप्स प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे.
———विशाल सोळंकी (शिक्षण आयुक्त)

Exit mobile version