Site icon ज्ञानसंवाद

सिम कार्ड संबंधित नवा नियम; कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय, जाणून घ्या डिटेल्स

शशिकांत इंगळे,अकोला

15 सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक मिटिंग घेण्यात आली. या मीटिंगमध्ये मोबाईल मधील सिम कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. आता नवीन कनेक्शन घेतल्यास किंवा प्रीपेड वरून पोस्टपेड मध्ये किंवा पोस्टपेड वरून प्रीपेड मध्ये बदलण्याची प्रक्रिया सरकारने सोपी करून दिली आहे. यासोबतच आता तुम्हाला आधी प्रमाणे कोणताही प्रत्यक्ष अर्ज भरायचा नाही. हा फॉर्म आता टेलिकॉम कंपन्या डिजिटल पद्धतीने करू शकते. म्हणजे ग्राहकाला घरी बसून हे काम करता येईल. या निर्णयाला कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आले आहे.

1 रुपया शुल्क आकारून होणार काम

हे E-KYC ॲपवर आधारित असल्याबाबत माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे. म्हणजे सेवा देणारी कंपनी ॲप वर डॉक्युमेंट अपलोड करतील. त्या सेल्फ KYC करिता ग्राहकाला फक्त एक रुपया शुल्क आकारणी होणार आहे.

KYC पोस्टपेड वरून प्रीपेड किंवा प्रीपेड वरून पोस्टपेड करणे आवश्यक आहे. नियमानुसार एखादा ग्राहक पोस्टपेड वरून प्रीपेड किंवा प्रीपेड वरून पोस्टपेड मध्ये चेंज करत असेल तर, त्या ग्राहकाला प्रत्येक वेळी KYC करावी लागत होती. परंतु आता दर वेळी KYC न करता फक्त एकदाच करण्याची गरज लागणा आहे.

आता सेल्फी KYC सुद्धा करता येईल
आधी KYC साठी कस्टमरला स्वतः डॉक्युमेंट जमा करावे लागत होते आणि नंतर स्वतः कस्टमर केअरला जाऊन KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. परंतु आता स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डॉक्युमेंट अपलोड करून E-KYC करू शकतो. ज्यावेळी तुम्ही तुमच्या KYC करता. त्याला E-KYC असे म्हटले जाते. हे सर्व वेबसाईट किंवा एप्लीकेशन द्वारे केले जाऊ शकते. सेल्फ KYC द्वारे सर्वांना आधी सिम प्रोव्हायडर चे अप्लिकेशन फोन मध्ये डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर एक अल्टरनेट नंबर द्यावा लागेल. जो तुमच्या ओळखीचा असेल त्यावर ओटीपी येईल. यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल. यात सेल्फ केवायसी चा ऑप्शन निवडून मागितलेली माहिती लागणार आहे.

Exit mobile version