Site icon ज्ञानसंवाद

12 वी निकालाबाबत चे कामकाज पूर्ण; तारीख लवकरच जाहीर होणार

शशिकांत इंगळे,अकोला

वार्ताहर: राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचे कामकाज जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे मंडळाने हा निकाल जाहीर करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ची घोषणा लवकरच केली जाईल अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे. राज्यात कोल्हापूर आणि कोकणात भागात अतिवृष्टी झाल्याने काही भागातून निकालाची माहिती येणे बाकी असून उर्वरित ठिकाणाची माहिती मंडळाकडे आलेली आहे. हा निकाल वेळेत जाहीर केला जाईल. असेही सांगण्यात आले आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने दहावी प्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनावर आधारित उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण आणि प्राचार्यांकडून अंतर्गत मूल्यमापन करण्याचे कामकाज नुकतेच पूर्ण झालेले आहे. त्यासाठीची संपूर्ण यादी मंडळाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. त्यामुळे 31 जुलैपूर्वी बारावीचा निकाल जाहीर करा. असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या मुदतीपूर्वीच राज्य शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लगेच महिन्याभरानंतर त्यांच्यासाठी मूल्यमापन कार्यपद्धती ठरवण्यात आली त्यानंतर शासन निर्णय काढून कार्यवाही सुरू करण्यात आली होती.

Exit mobile version