Site icon ज्ञानसंवाद

एक पाऊल भविष्यवेधी शिक्षणाच्या दिशेने …. लेख क्रमांक २

         भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्याची परंपरा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. विद्यार्थांच्या जीवनात शिक्षक हाच महान गुरू असतो.आज शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला दिसतो; परंतु तंत्रज्ञान शिक्षकांची जागा कदापि घेऊ शकणार नाही.शिक्षकांचे स्थान समाजात काल जसे अढळ,चिरस्थायी आणि वंदनीय होते,आजही तेच आहे आणि  भविष्यातदेखील  पिढ्यानपिढ्या तसेच  राहील.

शिक्षक म्हणजे..
इंग्रजी भाषेत शिक्षकाला Teacher म्हणून संबोधले जाते.जरा खोलवर जाऊन विचार केल्यास या शब्दाची व्याप्ती आपणास कळेल .
TEACHER
T- TALENT
E- EDUCATION
A- ATTITUDE
C- CHARACTER
H- HARMONY
E- EFFICIENT
R- RELATION
ज्याच्याकडे प्रतिभा,विद्वत्ता,शिक्षण,विधायक दृष्टीकोन,चारित्र्य,सुसंवाद,कार्यक्षमता,बांधीलकी आहे तोच खरा शिक्षक.शिल, क्षमा आणि कला यांचा त्रिवेणी संगम म्हणजे शिक्षक.
शिक्षकाची महानता …
शिक्षक म्हणजे एक समुद्र ,
ज्ञानाचा….पावित्र्याचा,
एक आदरणीय कोपरा,
प्रत्येक व्यक्तीच्या मनातला…
शिक्षक… अपूर्णाला पूर्ण करणारा,
शिक्षक… शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
शिक्षक… जगण्यातून जीवन घडवणारा,
शिक्षक… तत्वातून जीवन मूल्ये फ़ुलविणारा.

     शिक्षकाकडे नेहमी ज्ञानाची तहान असते,तो स्वतःला नेहमी विद्यार्थ्याच्या भूमिकेत  बघत असतो,तो नेहमी विद्यार्थांची प्रगतीच पाहत असतो.स्वतः बरोबरच विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करत असतो.विविध संस्कार सिंचनातून विद्यार्थीरूपी उत्कृष्ट कलाकृती घडवितो.म्हणूनच शिक्षक हा एकमेवाद्वितीय असतो,त्याला कोणाचीही उपमा देता येत नाही अथवा कोणाबरोबर त्याची तुलना करणे देखील अशक्य आहे.अशा विश्ववंदनीय शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम.

                                                                       क्रमशः  श्री.रामसिंग पी.राजपूत (प्राथ.शिक्षक)
शास.माध्य.आश्रमशाळा,देसगाव 
ता.कळवण जि.नाशिक 
9404873847

Exit mobile version