वार्ताहर: दोन वर्षा पासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या शिक्षकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. शिक्षक पदासाठी पात्र शिक्षकांसाठी आता भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. असा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७,००० आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३,००० अशी एकूण ४०,००० शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. शिक्षण विभाग पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रिक्त जागा भरणार आहे.