Site icon ज्ञानसंवाद

सिंहगड महाविद्यालयात डॉ.यशश्री पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ई- राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

सोलापूर:-

एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जनरल सायन्स व इंजिनिअरिंग विभाग व शिवाजी विद्यापीठ मॅथेमॅटिक्स सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रिसेन्ट ट्रेंड्स इन प्युअर अँड ऍपलाईड मॅथेमॅटिक्स’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक २४ जुलै रोजी करण्यात आले आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी दिली.
पुढे बोलताना डॉ. शंकर नवले म्हणाले की, मूळ सोलापूर च्या असणाऱ्या व शिवाजी विद्यापीठ येथे गणित विभागाचे विभागप्रमुख भूषवणाऱ्या , गणित विषयात मोलाचे योगदान दिलेल्या डॉ. यशश्री शिवाजी पवार यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही ई -राष्ट्रीय परिषद आयोजित केली असून अनेक नामवंत तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार असून यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातील डॉ. बी. एन.वाफरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. एस. आर. चौधरी, शिवाजी विद्यापीठातील डॉ. के. डी. कुचे यांचे ही मार्गदर्शन लाभणार आहे तरी विद्यार्थी , संशोधक, गणितप्रेमी मंडळी यांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. विनोद खरात यांनी केले.
अधिक माहितीसाठी 9552529262 किंवा 9970252033 या क्रमांकावर संपर्क साधावा.
यावेळी डॉ. इम्रान चंदरकी, डॉ. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. सविता कोंडा, प्रा. किरण पाटील, प्रा. संध्या पालमूर, प्रा. मन्सूरअली काझी,प्रा. रवींद्र देशमुख उपस्थित होते.

Exit mobile version