Site icon ज्ञानसंवाद

राज्यातील सर्व ग्रामीण शाळांना मिळणार शुद्ध पाणी पुरवठा…


पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

हिंगणघाट (प्रभाकर कोळसे) राज्यातील शाळांमधील उपस्थित बालकांच्या आरोग्याच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने कायम स्वरुपी पिण्याचे पाणी बालकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.यु डायस प्लस २०१९-२० नुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६५८८६ शाळा आहेत.त्यात नळ योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसलेल्या २४४१० शाळा आहेत.त्यापैकी ग्रामीण भागातील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.त्यासाठी शासनाने निश्चित कार्यपद्धती तयार केली असून आता लवकरच शाळांना शुद्ध पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे.
‌जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना, शाळा, अंगणवाडी केंद्रांना तसेच अन्य शासकीय संस्थांना वैयक्तिक नळ जोडणी द्वारे २०२४ पर्यंत शास्वत शुद्ध पेयजल योजना उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध आहे.तथापी देशातील सर्व शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये नळाद्वारे गुणवत्ता पुर्ण शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याकरिता देशाच्या पंतप्रधानांनी दि २ आक्टोबर २०२० पासून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेची घोषणा केली आहे.त्यानुसार राज्य शासनाने सर्व शाळांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याबाबच्या कार्यपद्धती चे आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी सरोज देशपांडे यांनी नुकतेच जारी केले आहेत.

https://drive.google.com/file/d/1Et905ccrpcT_KVBVYnPXqeobztH2sMFJ/view?usp=drivesdk

संबंधित शासन निर्णय वरील लिंक द्वारे डाऊनलोड करू शकता.


Exit mobile version