Site icon ज्ञानसंवाद

संच मान्यता 2020-21 कार्यरत शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरण्यासाठी स्कूल पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाली आहे.

➡️www.education.maharashtra.gov.in ओपन करा.

➡️ त्यानंतर “शाळा” यावर क्लिक करा.

➡️ त्यानंतर “Sanchya Manyata” यावर क्लिक करा.

➡️ पुन्हा “Sanchya Manyata” यावर क्लिक करा.

➡️ यानंतर लॉगिन पेज ओपन होईल शाळेचा यु डायस कोड, पासवर्ड व Captcha टाकून लॉगिन करून घ्या.

➡️ लॉगिन झाल्यानंतर संचमान्यतेसंबंधी आपणास सूचना दिसेल ती सूचना वाचून आपण त्यावर “Ok” असे म्हणा.

➡️ यानंतर “Working Post” या मेनूमध्ये “Add Working Teaching Staff” या ऑप्शन वरती क्लिक करून “Medium” निवडून घ्या व योग्य अनुदान प्रकारानुसार 1 October 2020 रोजी कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून “Update” व “Finalize” करून घ्या.

➡️ यानंतर “Working Post” या मेनूमध्ये “Add Working Non-Teaching Staff” या ऑप्शन वरती क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार 1 October 2020 रोजी कार्यरत शिक्षकेतर संवर्गातील पदांची माहिती नोंद करून “Update” व “Finalize” करून घ्या.

➡️ “खात्रीसाठी “Progress Bar” चेक करून घ्या.

Exit mobile version