Site icon ज्ञानसंवाद

Ph.D प्रवेश परीक्षा २०२१ अर्ज करण्याची प्रक्रिया

शैक्षणिक वार्ता:Ph.D
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा 22 ऑगस्ट 2021 रोजी होणार; अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2021
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बहुप्रतिक्षित पीएच.डी प्रवेशाची शैक्षणिक वर्ष 2021 साठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या रिक्त जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येणार आहे.पेट परीक्षेच्या अर्जाबाबत महत्वपूर्ण तारखा,परीक्षा स्वरूप, शुल्क, अभ्यासक्रम व परीक्षा तयारी याबाबत माहिती सविस्तरपणे पुढीलप्रमाणे आहे.

पीएच.डी प्रवेश परीक्षा (PET) महत्वपुर्ण दिनांक

★ऑनलाइन पेट परीक्षा दिनांक – 22 ऑगस्ट 2021

★ऑनलाइन अर्ज दिनांक – 12 जुलै 2021 ते 31 जुलै 2021

★पेट परीक्षा निकाल- 24 ऑगस्ट 2021

★ऑनलाइन अर्ज संकेतस्थळ व पीएच.डी नियम व रिक्त जागा माहिती संकेतस्थळ-
http://bcud.unipune.ac.in/phd_entrance/applicant/login.aspx

     परीक्षा फिस

खुला प्रवर्ग – 1000 रुपये
मागास प्रवर्ग – 750 रुपये
नेट – सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे.त्यांच्याकरिता परीक्षा फिस खुला प्रवर्ग 800 व मागास प्रवर्ग 600 रुपये आहे.

पीएच.डी प्रवेश परीक्षा(PET) अभ्यासक्रम स्वरुप व तयारी
युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षेत दोन पेपर आहेत. यामधील पेपर एक Research Methodology (संशोधन पद्धती) व पेपर दोन Subject Specific (विषयाशी निगडित) आहे. पेट पेपर एक 50 प्रश्न संशोधन पद्धतीवर आधारित आहेत, तसेच पेपर दोनमध्ये पदव्युत्तर विषयाशी निगडित 50 प्रश्न विचारले जाणार आहेत.
पेट परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असून एकूण प्रश्न 100 असणार आहेत. परिक्षेस निगेटिव्ह मार्किंग पद्धती लागू नाही.
या दोन्ही पेपरमधील अभ्यासक्रमाचे स्वरूप व त्यासाठी आवश्यक मूलभूत संदर्भ ग्रंथ पुढील प्रमाणे आहे
पेपर एक – संशोधन पद्धती
यातील पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे.संशोधन पद्धती विषयाची माहिती समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत.
१.पीएच.डी प्रवेश परीक्षा “संशोधन पद्धती” परीक्षाभिमुख विवेचन व 500 वस्तुनिष्ठ प्रश्न – डॉ.शशिकांत अन्नदाते (दुसरी आवृत्ती) के’सागर पब्लिकेशन्स,पुणे
२.सामाजिक संशोधन पद्धती – डॉ.प्रदीप आगलावे,विद्या प्रकाशन, नागपूर
३.Research Methodology – C.R.Kothari
४.Research in Education-J.W.Best
५.Designs of Social Research – Das, D.K.Lal

पेपर दोन – विषयाशी संबंधित
पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील.
पीएच.डी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्ग 50 टक्के व मागास प्रवर्ग 45 टक्के गुण आवश्यक आहे.
पीएच.डी करिता फेलोशिप
पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.

2021 पासून पीएच.डी.अत्यावश्यक
युजीसीच्या धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे.तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.
(सदर उच्च शिक्षणाशी संबंधित शैक्षणिक माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती.)
Ph.D Entrance Test 2021
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील पीएच.डी प्रवेश परीक्षांची (PET) तयारी करण्यासाठी अद्ययावत माहिती व मार्गदर्शन
https://t.me/phd07

सेंटर निहाय उपलब्ध सीट माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Exit mobile version