Site icon ज्ञानसंवाद

वर्धा येथे पत्रकार दिनी पत्रकार प्रभाकर कोळसे यांचा महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीचे वतीने गौरव!


बजाज वाचनालय वर्धा येथे पत्रकार दिनाचे आयोजन

हिंगणघाट ( प्रभाकर कोळसे)

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र शाखा वर्धा जिल्ह्याच्या वतीने सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय वर्धा येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ अभ्युदय मेघे,जि प अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार , लोकसत्ता चे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत देशमुख,हितवाद चे जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र देशमुख, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, अमरावती चे डा संघपाल उमरे, जिल्हा अध्यक्ष रविराज घुमे, सचिव योगेश कांबळे, कार्याध्यक्ष शेख सत्तार, मंचकावर उपस्थित होते.
यावेळी ग्रामिण भागात उत्कृष्ठ पत्रकारिता आपल्या लेखनीतून तळागाळातील समस्यांना वाचा फोडणारे ,शोधपत्रकारीता करणारे सकाळ चे बातमीदार प्रभाकर कोळसे यांना खासदार रामदास तडस यांचे हस्ते शाल, श्रीफळ,प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वीत करण्यात आले.
यावेळी खासदार रामदास तडस पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकार हा चौथा स्तंभ असून तो आपल्या लेखनातून,क्यामेरातुन दिवस- रात्र, उन- पाउस थंडी याची तमा न बाळगता सतत समाजासाठी स्वत:ला झोकून टाकणारा एकमेव प्राणी आहे. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पत्रकार विनोद महाजन,रवि साखरे,प्रकाश झांजडे ,राजु बाळापुरे, गणेश शेंडे यांनी परिश्रम घेतले.संचालन पत्रकार नारायण जारुंडे यांनी तर आभार मोहन सुरकार यांनी मानले .

@ फोटो पत्रकार प्रभाकर कोळसे यांना सन्मानित करताना खासदार रामदास तडस, डॉ . अभ्युदय मेघे तथा आदी मान्यवर

Exit mobile version