Site icon ज्ञानसंवाद

सामाजिक सहभागातून फळबाग उद्यान लागवड

श्री.अनिल कांबळे,राजूर

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जवळेबाळेश्वर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर याठिकाणी या शैक्षणिक वर्षात सामाजिक सहभागातून फळबाग उद्यानाचे काम हाती घेण्यात आले यासाठी शाळेच्या इमारती मागील परिसराची निवड करून त्या ठिकाणी शंभर केशरी आंबे व 25 लखनऊ पेरू रोपांची लागवड करण्यात आली तसेच त्यांना ठिंबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली. यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब कौटे ,श्री.बन्सी आप्पा चिखले,श्री. पांडुरंग कौटे श्री.शांताराम चिखले श्री.बाळू उमा कौटे व सर्व सदस्य ,शाळेतील सर्व शिक्षक वृंद ,वर्ग चार कर्मचारी वृंद शाळेतील माजी शिक्षक व माजी मुख्याध्यापक व जवळेबाळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. अजय बांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Exit mobile version