Site icon ज्ञानसंवाद

रिसर्च पेपर मार्गदर्शन कार्यशाळा

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अंतर्गत संशोधन विभागामार्फत संशोधन पेपर (शोधनिबंध) यांचे संपादन करून ते रिसर्च बुलेटीन या अंकात प्रकाशित केले जातात. त्यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी व शिक्षक यांचेकडून त्यांनी केलेल्या संशोधनावर आधारित रिसर्च पेपर (शोधनिबंध) मागविण्यात येतात.
या अनुषंगाने रिसर्च पेपरचे (शोधनिबंधांचे) लेखन कसे करावे यासंबंधी राज्यस्तरावरून संशोधन विभागाद्वारे पुढील महिन्यात ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अधिकारी व शिक्षक यांनी पुढील लिंक दि. ०८ जुलै २०२१ पूर्वी भरावी
https://tinyurl.com/researchpaperguidence

…………………………………

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Exit mobile version